Sat, Jun 06, 2020 06:35होमपेज › Marathwada › लातूर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; बळीराजाला दिलासा

लातूर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; बळीराजाला दिलासा

Published On: Aug 16 2018 7:58AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMप्रतिनिधी : लातूर 

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकाला जीवदान मिळाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकत होती. अनेक पिके होरपळली होती. सोयाबीन फुले व शेंगांचे हाताला येण्याच्या अवस्थेत आल्यावर पावसाने पाठ फिरवल्याने संकट ओढावले होते. आता आपले कसे होणार ? व साल कसे कडेला निघणार ही चिंता त्याला खात होती. निसर्गापुढे हतबल बळीराजाला पावासाची वाट पाहण्याशिवाय काहीच करणे शक्य नव्हते. अशा वेळी पडत असलेल्या पावसाने त्याच्यात उत्साह भरला आहे. सोयाबीनसह सर्वच पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. हा पाऊस आणखी काही दिवस जोरदार पडला तर जलस्रोतांना पाणी येणार आहे.