Fri, Nov 16, 2018 01:15होमपेज › Marathwada › अवकाळीच्या धास्तीने शेतकरी चिंतेत

अवकाळीच्या धास्तीने शेतकरी चिंतेत

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 11 2018 12:41AMमाहोरा : प्रतिनिधी 

यंदा रब्बी हंगामातील पिके जोमात बहरली आहेत. पीक परिस्थितीही समाधानकारक आहे. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळीची धास्ती शेतकर्‍यांना पडली आहे. मागच्याप्रमाणे यंदाही अस्मानी संकट येत की, अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे पिके काढणीला वेग आला आहे.

माहोरा परिसरात या वर्षी रब्बीच्या पेर्‍यात वाढ झाली आहे. मात्र तीन-चार आठवड्यांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे तोंडी आलेला घास वाया जातो की काय अशी भीती सध्या शेतकर्‍यांत निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी या पिकांची सध्या काढणी चालू आहे. सध्या वातावरण ढगाळ असून पुढील काही दिवसांत काही ठिकाणी तुरळक  तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यामुळे शेतकरीवर्गात एकच धावपळ सुरू झाली आहे. पिके यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी सध्या  सकाळपासूनच शेतात दिसत आहेत. आपली पिके यापासून कशी सुरक्षित ठेवली जातील याची व या अवकाळी पासून या पिकांचे संरक्षण करण्यात शेतकरी सध्या गुंतल्याचे चित्र या भागात बघायला मिळत आहे.