होमपेज › Marathwada › हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:32PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपूर्वी तापमान 42 अंश सेल्सियसवर पोहोचले होते. त्यात शनिवारी (दि.2) दुपारी चार वाजेच्या सुमारास तापमान अचानक 32 अंश सेल्सियसवर येत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या.  नाल्यात केरकचरा अडकल्यामुळे नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहनधारकांना घाण पाण्यातून वाट काढावी लागली.

गतवर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. त्यात भारतीय हवामान खात्याने यंदा चांगला मान्सूनचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला. त्यातच शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन  मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची चांगलीच पंचायत झाली. या पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यात केरकचरा अडकल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत होते. यातून वाहनधारकांसह नागरिकांना वाट काढावी लागली.