Wed, Jun 26, 2019 18:22होमपेज › Marathwada ›  रेल्वेेमार्गाचे भूसंपादन पूर्ण

 रेल्वेेमार्गाचे भूसंपादन पूर्ण

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 9:04PMबीड : प्रतिनिधी

जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम वेगात सुरू आहे. या मार्गासाठीच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून 7.40 हेक्टर आर मोजणी स्तरावर आहे. या संपादनापोटी 446 कोटींचा मावेजा वाटप करण्यात आला असून रेल्वे ट्रॅक, पूल उभारणीचे कामही सुरू आहे.

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी गत दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांनी या मार्गाच्या निधीसाठी पाठपुरावा केला आहे. अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर भरघोस तरतूद होऊन कामाला गती प्राप्त झाली आहे. रेल्वेमार्गाच्या कामातील महत्त्वाचा भाग असलेले भूसंपादनाचे कामही प्रशासनाने गतीने पूर्ण केले आहे. एकूण 240 किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी 1538 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून त्यापोटी 446 कोटींचा मावेजा वाटप करण्यात आला आहे. तर 7.40 हेक्टरचे क्षेत्र मोजणी स्तरावर आहे. या क्षेत्राच्या मोजणीबाबत सबंधीत ग्रामस्थांचा विरोध असल्याने पोलिस बंदोबस्तात मोजणी होणार आहे.

2019 पूर्वी येणार रेल्वे

2019 पूर्वी बीडला रेल्वे आणण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे या प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुर्‍या, रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कामावर भेट देऊन त्याची पाहणीही खा. मुंडे, पंकजा मुंडे यांनी केली आहे. रेल्वेचे काम गतीने करण्याबाबत अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

पुलांचे काम पूर्ण

या रेल्वेमार्गावर उभारण्यात येणार्‍या पुलांचे काम पूर्ण झाले असून काहींचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे ट्रॅकसाठीचा भराव टाकून मजबुतीकरण करण्यात येत आहे. कंत्राटदारांकडून होत असलेल्या या कामावर अधिकारी देखरेख करत आहेत.