होमपेज › Marathwada › तुम्हाला द्यायला, आमच्याकडे काहीच नाही

तुम्हाला द्यायला, आमच्याकडे काहीच नाही

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 1:04AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील केज येथील गटसाधन केंद्रातील दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी काही विद्यार्थ्यांनी पुनःतपासणीसाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकितप्रतसाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यासाठी उत्तरपत्रिका नसल्याने आता ङ्गउत्तरपत्रिका जळाल्याने, तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाहीफ असे समजावून सांगितले जाणार असल्याचे मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. 
 3 मार्च रोजी बारावीचा गणिताचा, तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयांचे पेपर झाले. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. 4  मार्च रोजी सायंकाळी अचानक या ठिकाणी आग लागून बारावीच्या 1 हजार 199, तर दहावीच्या 221 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. बारावीच्या निकालात इतर विषयांत मिळालेल्या गुणांचा सुवर्णमध्य काढून सरासरी गुण देण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांचा आक्षेप नोंदवण्यासाठी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीची मागणी या प्रकरणातील काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. मात्र, उत्तरपत्रिका जळाल्याने या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत आता कोठून द्यायच्या या प्रश्‍नावर राज्य मंडळाकडून विभागीय सचिवांनी मार्गदर्शन मागविले होते. त्यावर राज्य मंडळाकडून, विद्यार्थ्यांना या सर्व प्रकरणाची भीषणता सांगून त्यांना समजावून सांगा, असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे आता या विद्यार्थ्यांसमोर सचिव हतबलता व्यक्‍त करत आहेत.