Sat, Apr 20, 2019 08:03होमपेज › Marathwada › 'आजार बरा करण्यासाठी ४० दिवस सोबत रहा' बाबाची भोंंदूगिरी

'आजार बरा करण्यासाठी ४० दिवस सोबत रहा' बाबाची भोंंदूगिरी

Published On: Dec 19 2017 5:08PM | Last Updated: Dec 19 2017 5:13PM

बुकमार्क करा

गेवराई : प्रतिनिधी 

अंधश्रद्धेचा एक भयंकर प्रकार गेवराई शहरात समोर आला आहे. शहरातील अचानकनगर येथील रोकडे नामक भोंदू बाबाची चांगलीच चर्चा होत आहे. आजार दूर करतो, असे सांगून विवाहित महिलेस चाळीस दिवस सैलानी बाबा येथे राहण्यासाठी सांगत होता. या प्रकाराला महिलेच्या सासूने विरोध केल्याने भोंदूगिरी करून त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर सासूने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी अद्याप भोंदूबाबाला अटक करण्यात आलेली नाही. 

शहरातील अचानकनगरमधील रोकडे नामक बाबाची भोंदूगिरी समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेला आजार असल्याचे सांगत, रोकडे नामक भोंदूबाबा चाळीस दिवस सैलानी बाबा येथे सोबत राहण्यास सांगत होता. आजार पूर्णपणे बरा करतो म्हणून भोंदूगिरी करत आहे.

या प्रकाराला महिलेच्या सासूने विरोध दर्शविला. या चिडलेल्या भोंदूबाबाने घरात लिंबू, अंगारा घरात तसेच पाण्यात टाकून अंधश्रद्धेचा कळस गाठून त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या सासूने पोलिसांत धाव घेऊन रोकडे नामक भोंदूबाबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुनेच्या अंगात बाबा

आता तर चक्क सुनेच्या बाबा अंगात येऊ लागले आहेत. तू जाळून घे असे सांगतात व सुनेनेही बाबाच्या भोंदूगिरीला बळी पडत घरामध्ये धिंगाणा घालण्यास सुरुवात केली आहे. सुनेची आई व नातेवाईक देखील तिला बाबासोबत का जाऊ देत नाही म्हणून नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे उद्या जर या बाबाच्या प्रकारामुळे सुनेने जीवाचे काही बरे वाईट केल्यास त्‍याला जबाबदार कोण सवाल उपस्‍थित करून पोलिस कारवाई करण्याची मागणी सासूने केली आहे. 

जादू टोणा विरोधी कायदा

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही काही ठिकाणी अजूनही भोंदूगिरी चालू आहेच.अशा भोंदूगिरी करणाऱ्या लोकांवर कायदा व पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपणही समाजाचा एक भाग असून सर्वांनी समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मूलनावर जनजागृती करुन प्रबोधन करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आनंद सुतार यांनी व्‍यक्‍त केली आहे.