होमपेज › Marathwada › जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे धडकले

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे धडकले

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 10:22PMपरभणी : प्रतिनिधी

वैद्यकीय प्रवेशात मराठवाड्यावर होत असलेला अन्याय, राईनपाडा घटना, मातंग समाजावरील अत्याचार आदी घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी परभणीत बुधवारी मोर्चे आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. वैद्यकीय प्रवेशाचा 70/30 हा फार्म्यूला तत्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालावर मोर्चा काढण्यात आला होता. एमबीबीएस प्रवेशासाठी मराठवाडा, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र असे विभाग पाडले आहेत. मराठवाड्यात सहा महाविद्यालये असून,  750 जागा आहेत. तसेच विदर्भात 8 तर 1100 जागा व उर्वरित महाराष्ट्रात 23 आणि 3 हजार 80 जागा आहेत.  

ज्या विभागात महाविद्यालये आहेत, त्या विभागातील मुलांना एमबीबीएससाठी 70 टक्के राज्य कोटा जागेसाठी प्रवेश देण्यात येतो. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. यामुळे तो फार्मुला तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात रामेश्‍वर शिंदे, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब पानपट्टे, सुधाकर सोळंके, अरूण पवार, सुभाष चव्हाण, शाम सवंडकर, दौलत शिंदे, नागेश लोंढे, नारायण देशमुख, अरूण मराठे, डॉ.मारोती हुलसूरे, प्रेम अवचार, रवि तांबे, नरहरी पाते, आकाश गायकवाड, सोनू पवार, अजय मोरे, सतिश टाक, गोविंद कदम, उध्दव सोळंके, वसंतराव काळे, सिध्देश्‍वर चौकट, सोपान काळबांडे, ओंकार कराळे, माधव थिटे, संतोश मुंडलीक, ज्ञानोबा सवंडकर आदी सहभागी झाले होते.

मातंग समाजाचे दोन मोर्चे

महाराष्ट्रात मातंग समाजावर वेगवेगळया प्रकारचे अन्याय होण्याची मालिका सुरू आहे. यावर आळा बसविण्यात यावा या मागणीसाठी दोन संघटनांच्या वतीने मोर्चे काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. लालसेनेचे गणपत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. मुगाजी बुरूड, बापुराव वाघमारे, प्रल्हादराव आवचार, भगवानराव घूले, गंगाधर पौळ, विश्‍वनाथ गवारे, अविनाश मोरे, चांदुराम बोराडे, हेमंत साळवे, धोंडीराम कदम आदींचा मोर्चात सहभाग होता. दुसरा एल्गार मोर्चा लहुजी साळवे बहुजन क्रांतीसेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. हा मोर्चा देशमुख गल्‍ली मार्गे काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात अजय पारधे, संदीप साळवे, अमर ओव्हळ, प्रमोद बोराडे, बालाजी लेंडे, विशाल वाव्हुळे, सोनू जाधव, पंकज शिंदे, हिरामण साळवे, हनुमान ससाणे, ओंकार पांचाळ, दिनेश डुमणे, शुभम पाईकराव, दिनेश जोगदंड, शिवम जाधव आदींचा सहभाग होता.
वासुदेव समाजाचे निवेदन

राईनपाडा घटनेच्या निषेधार्थ वासुदेव समाजातर्फे जिल्हाधिकार्‍याांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर नागेश घोगरे, राजेंद्रकुमार महाजन, माधव चव्हाण, विश्‍वनाथ सुक्टे, सुनिल ससाणे, सुखदेव चव्हाण, नागेश सुक्टे, अशोक धुर्वे, संतोष सुक्टे, कोंडीबा ढवळे, गंगाधर वास्टर, प्रकाश वाकोडे, संतोश महाजन, उत्‍तम केंद्रे, मानाजी चव्हाण, गौतम रणखांबे, संदिप सोळंके, सय्यद अजहर, सचिन देशपांडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.