Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Marathwada › कठूआ बलात्काराच्या निषेधासाठी हजारो लातुरकर रस्त्यावर

कठूआ बलात्काराच्या निषेधासाठी हजारो लातुरकर रस्त्यावर

Published On: Apr 20 2018 8:40PM | Last Updated: Apr 20 2018 8:40PMलातूर : प्रतिनिधी

कठुआ, उन्नान आणि सुरत येथील घटनेच्या निषेधार्थ  शुक्रवारी लातूरकरांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाने लक्ष वेधले. उन्हाची पर्वा न करता हजारो नागरीक मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना मुलींनी निवेदन सादर केले.

आझमगंज गंजगोलाई येथून दुपारी तीनच्या सुमारास मोर्चा मार्गस्थ झाला. गुन्हेगारांना फाशी द्या, मुली म्हणजे खेळणी नसतात, नसतात धर्माच्या सोगट्या, लाज वाटते, संताप येतो बलात्कारांना फासावर चढवा, अशा मजकुरांचे फलक त्यांच्या हाती होते.

कठुआ, उन्नान आणि सुरुत घटनेतील आरोपींचे  खटले जलदगती न्यायालयात चालवावेत. दोषिंना फाशीची शिक्षा द्यावी, कठुआ प्ररणातील आरोपींच्या समर्थनार्थ दोषारोपपत्र दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या वकीलांच्या सनदी रद्द कराव्यात. आरोपींना समर्थन देणाऱ्या भाजपांच्या आमदारांवर निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी घालावी. पीडीत परीवारास सरकारनाने  आर्थिक मदत व संरक्षण द्यावे. पीडितेचा खटला चालवणाऱ्या अॅड. दिपीका राणावत यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी. कठुआ पीडितेची आणि तिच्या परिवाराची ओळख सार्वजनिक करणाऱ्या माध्यमांवर कारवाई करावी, प्रसंगी बंदी घालावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. टाऊन हॉलच्या मैदानावर मोर्चाचा समारोप झाला.