होमपेज › Marathwada › अभियंत्याच्या दालनात बोंबा मारो आंदोलन

अभियंत्याच्या दालनात बोंबा मारो आंदोलन

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:57AM बीड : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम अंतर्गत अनेक कंत्राटदारांनी कामे केली मात्र दोन वर्षे होऊनही त्यांची बिले अदा करण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली. तीस कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थकला आहे. हा निधी मिळावा यासाठी कंत्राटदारांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर व  कार्यकारी अभियंत्याच्या दालताना शुक्रवारी बोंब ठोकून निषेध व्यक्‍त केला. निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यकारी अभियंता उपस्थित राहिले नसल्याने कंत्राटदारांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवले. 

सार्वजनिक बांधकाम खातेअंतर्गत 3054 हेड अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली, मात्र कामे करूनही राज्य शासनाकडून त्यांची बिले काढली जात नाहीत. काही कंत्राटदारांची दोन ते अडीच वर्षांपासूनचे जुने थकीत बिले आहेत. या बिलाचा पाठपुरावा बांधकाम खात्याकडून केला जात नाही. सध्या मार्च एन्ड असल्याने बिलं काढण्याबाबत संबंधित खाते टाळाटाळ करत असल्याचे कंत्राटदरांचे म्हणणे आहे. त्याच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी शुक्रवारी कार्यालयासमोर बोंब ठोकून निषेध केला.