होमपेज › Marathwada › ‘एसएमएस’ने केलेल्या तक्रारींची घेतली दखल

‘एसएमएस’ने केलेल्या तक्रारींची घेतली दखल

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:59PMपाटोदा : महेश बेदरे 

लोकप्रतिनिधींबद्दल सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळेच कुतुहूल असते. त्याचप्रमाणे या नेत्यांबद्दल अनेक समज गैरसमज देखील असतात त्यातच आमदार, खासदार म्हटले की ते भेटत नाहीत वेळ देत नाहीत अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तक्रार असते, मात्र या सर्व बाबींना बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे या मात्र अपवाद ठरल्या  आहे. नागरिक व कार्यकर्त्यांच्या साध्या एसएमएसद्वारे कळविलेल्या समस्यांचीही तत्काळ दखल घेऊन त्या मार्गी लावण्यात त्यांनी प्राधान्य दिले आहे. 

देशात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविलेल्या बीड जिल्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे या आपल्या संवेदनशिल स्वभावासाठीही प्रसिद्ध आहेत. अनेक प्रसंगी कार्यकर्त्यांना हा अनुभव येत आहे. 

सध्या पाटोदा तालुक्यात   शेतकर्‍यांच्या पेरण्यांची लगबग सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी गेल्यानंतर त्यांची अडवणूक होत असल्याचा प्रकार सुरू होता. या विषयी काही शेतकरी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र याविषयी फारशी हालचाल होत नव्हती, दरम्यान काही कार्यकर्त्यांनी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केवळ एसएमएसद्वारे याची माहिती दिली व खा. मुंडे यांनीही तत्काळ दखल घेत सुत्रे फिरवली व हा प्रश्‍न मार्गी लावला.

कोणत्याही सामाजिक समस्या साध्या एसएमएसद्वारे ही खासदारांना कळविल्या तरीही त्याची दखल घेतली जाते व प्रतिसाद ही दिला जातो असा विश्‍वास कार्यकर्त्यांना देखील आला आहे. कार्यकर्ते व सर्वसामान्य देखील  खासदारांचा रिप्लाय बघुन  समाधान व्यक्त करीतआहेत.