Fri, Apr 26, 2019 03:42होमपेज › Marathwada › 'संकट कितीही मोठे आले तरी स्वतःला एकटे समजू नका'

'संकट कितीही मोठे आले तरी स्वतःला एकटे समजू नका'

Published On: Feb 12 2018 12:14PM | Last Updated: Feb 12 2018 12:14PMबीड : प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील अनेक गावात रविवारी सकाळी गारपीठीचा तडाखा बसला. या गावांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे या सोमवारी सकाळी गेवराई तालुक्यातील खळेगाव, माटेगाव आदी गावांना भेट देऊन त्यांनी गावकर्‍यांना व शेतकर्‍यांना दिलासा दिला. नैसर्गिक संकट सांगून येत नाही पण कितीही संकट आले तरी स्वतःला एकटे कधीच समजू नका, पालकमंत्री पंकजा मुंडे, प्रशासन आणि आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला. 

रविवारी सकाळी अचानक बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील काही गांवाना गारपीठीचा फटका बसला. सुदैवाने यात कोणतेही जिवीतहानी झाली नाही. मात्र शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काही घरांचीही पड झाली आहे. या घटनेनंतर  प्रिमताई यांनी गेवराई तालुक्यातील गारपीठग्रस्त गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी खळेगाव, माटेगाव आदी गावाना भेटी दिल्या.

या गारपीठीमध्ये ज्या परिसराचे नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना पालकमंत्री  मुंडे यांनी दिले असल्याचे सांगितले.

याबाबत आज दुपारी आम्ही देखील जिल्ह्याधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे. शेतकर्‍याना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गेल्या दोन तीन वर्षात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मोठया प्रमाणावर मिळत आहे. आताही अनुदानासोबत पीक विम्याची  रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, विजय गोल्हार, समाज कल्याण सभापती संतोष हंगे, तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, प्रमोद पुसरेकर आदी उपस्थित होते.

आज चहा पिणार नाही  

तुमच्याकडे कोण्यातरी विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी, कोणते लोकार्पण करण्यासाठी मला यायचे होते पण दुर्देवाने आज आपतकलीन परस्थितीत मला यावे लागले आहे. आपण माझ्यासाठी चहा केला आहे पण मी आज चहा पिणार नाही ज्यावेळी माझ्या शेतकर्‍याच्या मालाला भाव मिळेल, पीक जळणार नाही, तर पीक चांगले ज्यावेळी पीकेल आणि तुमच्या चेहर्‍यावर मला समाधन दिसेल, तुमच्या गावात एखाद्या विकासात्मक कामांचा शुभारंभ करील त्या दिवशी मी आपला चहा नक्की पिणार आहे. आज तुमच्या दु:खात मी सहभागी आहे. मी आज तुमचा चहा पिणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.