Sun, May 26, 2019 17:22होमपेज › Marathwada › प्रधानमंत्री आवास योजनेचे ९४८ घरकुले रखडली 

प्रधानमंत्री आवास योजनेचे ९४८ घरकुले रखडली 

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 1:14AMहिंगोली : प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन 2016-17 मध्ये मंजूर 3 हजार 715 घरकुलांपैकी अद्यापही 948 घरकुलांची कामे निधी अभावी रखडली असून लाभार्थी धनादेशासाठी पंचायत  समिती स्तरावर हेलपाटे मारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजने बरोबरच रमाई,शबरी, पारधी घरकूल योजनेचेही निधीअभावी काम रखडल्याने लाभार्थींची कोंडी झाली आहे.

सन 2016-17 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 3 हजार 715 लाभार्थींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 325 लाभार्थींना पहिला हप्ता वाटप करण्यात आला. तसेच 390 लाभार्थींना पहिला हप्ता देण्यात आला नाही. परिणामी एकूण 948 लाभार्थींचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन-2017-18 साठी 1047 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ 408 लाभार्थींना पहिला हप्ता वाटप करण्यात आला आहे. तर उर्वरीत 639 लाभार्थींना पहिीला हप्ता दिला नसल्यामुळे बांधकाम रखडल्याचे चित्र आहे. रमाई आवास योजनेंतर्गत मागील वर्षी निवडण्यात आलेल्या 1 हजार 79 लाभार्थींपैकी 968 लाभार्थींना पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर 111 लाभार्थी अद्यापही पहिल्या हप्त्यापासून वंचित राहिल्याने 243 घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. रमाई आवास योजनेंतर्गत चालवर्षी 1187 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी एकाही लाभार्थीला पहिला हप्ता देण्यात आला नसल्याने लाभार्थींना उसनवारी करून घरकुलाचे काम करावे लागत आहे. गतवर्षी शबरी घरकूल योजनेंतर्गत 227 लाभार्थींची निवड करण्यता आली होती. त्यापैकी 223 लाभार्थींना पहिला हप्ता देण्यात आला, परंतु दुसरा हप्ता वाटप न झाल्याने 66 घरकुलांचे काम थंड बसत्यात पडले आहे. पारधी घरकूल योजनेंतर्गत गतवर्षी 13 लाभार्थींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 10 लाभार्थींना पहिला हप्ता वाटप करण्यात आला तर निधीअभावी 3 लाभार्थी पहिल्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसह रमाई आवास योजना, शबरी घरकूल योजना, पारधी घरकूल योजनेचे देयक रखडल्यामुळे बांधकाम रखडले आहे. जवळपास दीड वर्षे उलटले तरी लाभार्थींना निधी उपलब्ध करून दिला नसल्यामुळे लाभार्थीर्ंंची कोंडी होत आहे. लाभार्थीर्ंंना तत्काळ प्रलंबित देयके अदा करून घरकूल योजना गतिशील करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांच्याकडे केली आहे.