Tue, Apr 23, 2019 00:05होमपेज › Marathwada › परभणीत अज्ञात वस्‍तुचा स्‍फोट, एक गंभीर

परभणीत अज्ञात वस्‍तुचा स्‍फोट, एक गंभीर

Published On: Jul 19 2018 2:47PM | Last Updated: Jul 19 2018 2:47PMपरभणी : प्रतिनिधी

परभणी येथे भर रस्त्यावर झालेल्या अज्ञात वस्‍तुच्या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील नांदखेडा रोडवर १९ जुलै रोजी सकाळी घडली. 

नांदखेडा रोडवर पलसिध्द सेवाश्रम परिसरात अचानक स्फोट झाल्याचा मोठा आवाज झाला. दरम्यान तेथे असलेले संजय अग्रवाल हे गंभीर जखमी  झाले. त्यांना काही अंतरावर असलेल्या संतोष नागनाथ डोंगरे यांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळी बाँम्बशोधक पथक दाखल झाले.