Mon, Jun 17, 2019 03:06होमपेज › Marathwada › ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरून दोघांचा मृत्यू

ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरून दोघांचा मृत्यू

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 08 2018 10:42PMचारठाणा : प्रतिनिधी   

येथील गॅस एजन्सीजवळ खताच्या  ट्रकला विजेच्या मुख्य तारेचा स्पर्श झाल्याने ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरून चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच मदतीसाठी आलेल्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना 7 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. 

चारठाणा येथील एका कृषी केंद्रावर खत उतरवून ट्रक क्र.एम.एच.22, ए.एन.9396 हा परभणीकडे जात असताना चारठाणा येथील गॅस एजन्सी जवळील विजेच्या मुख्य वाहिनीच्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने ट्रकचालक त्र्यंबक मुंजाजी काचगुंडे (वय 35 वर्षे,  रा. कुभकर्ण टाळकी ता.परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला. यातच ट्रक चालकाला मदत करण्यासाठी गेलेला चारठाणा येथील कृष्णा संभाअप्पा गजमल (वय 27 वर्षे) याचा जिंतूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सपोनि अजयकुमार पांडे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत कृष्णावर चारठाणा येथे तर त्र्यंबकवर कुंभकर्ण टाकळी येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.