Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Marathwada › साहित्य संमेलनात नेत्यांचा हस्तक्षेप नको : देशमुख

साहित्य संमेलनात नेत्यांचा हस्तक्षेप नको : देशमुख

Published On: Jan 07 2018 5:31PM | Last Updated: Jan 07 2018 5:31PM

बुकमार्क करा
उस्मानाबाद : पुढारी ऑनलाईन

साहित्य संमेलनात राजकीय हस्तक्षेप नको, असे मत साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले आहे. उस्मानाबाद येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गुजरातमध्ये बडोदे येथे होणाऱ्या ९१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे देशमुख असणार आहेत. 

देशमुख यांनी अनेक राजकीय विषयांवर थेट मत व्यक्त केले. राज्यातील फडणवीस सरकार बरोबरच केंद्र सरकावरही देशमुख यांनी टीका केली. दोन्ही सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चुकीची धोरणे राबविली जात असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. 

देशाची राज्य घटनाच बदलण्याची भाषा सत्ताधारी पक्षातून होत असल्याच्या मुद्यावरही देशमुख यांनी थेट भाष्य केले. ते म्हणाले, 'देशाची घटना बदलण्याची मागणी चुकीचे आहे. मुळात घटना बदलणे कोणालाही शक्य नाही. घटना बदलाची भाषा करणे ही केवळ भडक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचे आहे. मुळात अशी वक्तव्ये करणाऱ्यांनाही हे माहिती आहे की, घटना बदला येणार नाही.'