Mon, Aug 19, 2019 10:03होमपेज › Marathwada › हिंगोली: महिला उपाधीक्षकाची आत्महत्येची धमकी; पोलिस दल हदरले

हिंगोली: महिला उपाधीक्षकाची आत्महत्येची धमकी; पोलिस दल हदरले

Published On: Jun 09 2018 7:34PM | Last Updated: Jun 09 2018 7:34PMहिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली पोलिस दलाच्या गृह पोलिस उपाधीक्षक असलेल्या सुजाता पाटील यांनी हिंगोलीहून मुंबई येथे बदली होत नसल्यामुळे कंटाळून राजकुमार व्हटकर विशेष पोलिस महानिरीक्षक आस्थापना यांना संदेश पाठवून आत्महत्येची धमकी दिल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मागील दोन वर्षापासून हिंगोली पोलिस दलात सुजाता पाटील या गृह पोलिस उपाधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब मुंबई येथे असल्यामुळे त्यांनी सुरूवातीपासूनच मुंबई येथे बदलीसाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु, बदली होत नसल्यामुळे हताश झालेल्या सुजाता पाटील यांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक आस्थापना यांना भ्रमणध्वनीवर आत्महत्येच्या धमकीचा संदेश देत टोकाची भुमिका घेतल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळेच मला ही भुमिका 

माझे कुटुंब मुंबई येथे स्थायिक आहे. त्यातच मी पोलिस कर्मचार्‍याची मुलगी दत्‍तक घेतली आहे. तिचा सांभाळ व मुलीच्या शिक्षणासाठी माझी मुंबई येथे बदली व्हावी, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करित होते. परंतु, माझी जाणीवपुर्वक बदली करित नसल्यामुळे आज संदेश पाठवुन आत्महत्ये बाबत माझा निर्णय कळविला आहे. वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळेच मला ही भुमिका घ्यावी लागत असल्याची प्रतिक्रिया सुजाता पाटील यांनी दिली.