Fri, Nov 16, 2018 09:31होमपेज › Marathwada › नांदेड : पोलिस जमादाराचा आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड : पोलिस जमादाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नांदेड : प्रतिनिधी

मानसोपचार घेणार्‍या एक पोलिस जमादाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर घडली. अखेर पोलिसांनी  त्यास खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय जोंधळ हे सेवेवर सतत गैरहजर रहात असल्याने काही दिवसापूर्वीच त्यांची मुख्यालयात बदली केली होती. त्यावरून ते नाराज होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक अवस्‍था ठिक नव्‍हती. त्यामुळे डॉ. हंसराज वैद्य यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते. शनिवारी दुपारी 12 वाजता रुग्णालयातून ते थेट छतावर जाऊन गळयात दोरी टाकून  आत्महत्या करण्याची धमकी देत होते. ही बाब काही पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर डॉ. वैद्य हे जोंधळे यांना बोलण्यासाठी छतावर पोहचले, तर दुसरीकडे साध्या वेशात काही कर्मचारीही पोहचले. डॉ वैद्य यांच्याशी बोलण्यात गुंग असताना इतर कर्मचार्‍यांनी त्‍यांचावर झडप घालून त्‍यांना पकडण्यात आले. तासभर चाललेले हे नाट्य बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.