होमपेज › Marathwada › पोलिस दलातील 68 हजार जागा याच वर्षी भराव्यात

पोलिस दलातील 68 हजार जागा याच वर्षी भराव्यात

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:38AMबीड : प्रतिनिधी 

महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये हजारो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांसह पोलिस भरतीचीही तयारी करत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या 68 हजार जागा पूर्ण पणे भरल्या गेलेल्या नाहीत. दरवर्षी 12 हजार जागा भरल्या जाणार होत्या, परंतु 2014 ते 2017 या कालावधीत केवळ रिक्तच जागा भरल्या गेल्या. पोलिस दलातील 68 हजार जागा चालू भरतीमध्येच भराव्यात अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थींची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आ. विनायक मेटे यांच्याकडे केली आहे. 

पोलिस दलात मंजूर असलेल्या 68 हजार जागा याच वर्षीच्या जाहिराती मध्ये भराव्यात, महाराष्ट्र मैदानी व लेखी परीक्षेचे मेरीट जिल्हा निहाय न लावता केंद्रीय पद्धतीने लावावेत, बायोमॅट्रिक पद्धतीने उमेदवारांची उपस्थिती घ्यावी, युपीएससी परीक्षा शुल्का प्रमाणे पोलिस भरती शुल्क आकारण्यात यावे, भरतीवेळी सकाळी 11 वाजल्यानंतर मैदानी चाचण्या पूर्ण पणे बंद करण्यात याव्यात, रिटर्न घेतेवेळेस जिल्हा पोलिस, आयुक्तालय, एसआरपीएफ यांची एकाच दिवसी लेखी परीक्षा घेण्यात यावी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या मुला-मुलींची स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी या प्रमुख मागण्या आ. विनायक मेटे यांच्या समोर मांडत स्पार्ध परीक्षेची तयारी करणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळांने मांडल्या. आ. विनायक मेटे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्या सोडवण्याबाबत सकात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. 15 फेबु्रवारी रेाजी मुख्यमंत्री नारायणगडावर आल्यानंतर त्यांच्या समोर विद्यार्थ्यांच्या या समस्या मांडून त्या मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. शिष्टमंडळात प्रा. पंडित तुपे, प्रा. यादव सर, प्रा. कृष्णा पाठक, प्रा. बाळासाहेब कळसाने, सुशांत सत्राळकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांचा 
समावेश होता.