Sat, Sep 22, 2018 22:24



होमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपायाचा मृत्‍यू 

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपायाचा मृत्‍यू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





बिलोली : प्रतिनिधी 

बिलोली येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई शेख तौफिक शेख चाँद (वय, २८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्‍यांचा मृत्यू झाला आहे. बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मारुती सोमला चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बिलोली येथे कार्यरत असलेले व कर्तव्यदक्ष पोलिस शिपाई शेख तौफिक शेख चाँद (बकल नं. ९०८) हे दि २६ मार्च रोजी जेवण करून स्वतः ची बजाज पल्‍सर (एम.एच.२६ ए झेड ५४१० ) या दुचाकीवरून येत असताना नांदेड नरसी बोधन महामार्गावर एका अज्ञात वाहनाने त्‍यांच्या गाडीला जोराची धडक दिली. त्‍यामुळे त्यांच्या डोक्यातून व नाकातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यांना उपचारासाठी नांदेडला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात वाहनचालका विरुद्ध बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली साह्ययक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे हे तपास करीत आहेत.

अतिशय कार्यतत्पर असलेला शिपाई अपघातात मरण पावल्याने पोलिस खात्यात व जनसामन्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

Tags : nanded district, biloli, police

 






  •