Wed, Apr 24, 2019 15:48होमपेज › Marathwada › धक्कादायक, मृताच्या पोटात पोलीस वाहनाची नेमप्लेट 

मृताच्या पोटात पोलीस वाहनाची नेमप्लेट! 

Published On: Jan 11 2018 10:08AM | Last Updated: Jan 11 2018 10:08AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

अमरावती शहरात मृतावस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या पोटातून पोलिसांची नेमप्लेट निघाल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेल्वे  पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून, ती नेमप्लेट मृताच्या पोटात कशी गेली, हे गूढ कायम आहे.

अमरावती रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात  ठेवला. तीन दिवसानंतरही ओळख न पटल्याने मृतदेहाचे  पोस्टमॉर्टम करण्यात आले. तेव्हा पोटात पोलिस नेमप्लेट  आढळली. डॉक्टरांनी ही माहिती बडनेरा रेल्वे पोलिस व  शहर कोतवाली पोलिसांना दिली. 

पोटातून काढलेली ती  नेमप्लेट शहर गुन्हे शाखेत कार्यरत प्रल्हाद आकाराम केंद्रे  (बक्कल नं.305) या पोलिस शिपायाची असून, याबाबत  त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आला.  एका तपासानिमित्त चंद्रपूरला गेलेल्या केंद्रे यांना मृताचे छायाचित्र पाठविण्यात आले. मात्र, मृतास आपण ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले.