Sat, Sep 22, 2018 05:15होमपेज › Marathwada › लातूर : शेतीच्या वादावरुन भावाचा खून

लातूर : शेतीच्या वादावरुन भावाचा खून

Published On: Jun 18 2018 4:01PM | Last Updated: Jun 18 2018 4:01PMप्रतिनिधी : लातूर        

शेतीच्या वादावरुन एकाने त्याच्या चुलत भावाला भोसकून त्याचा खून केला. चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. सुनिल नामदेव जाधव (३०) असे मृताचे नाव असून या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात रामचंद्र शंकर जाधव याच्याविरुध्द गुन्हा नोंद झाला असून तो फरार आहे.

पुण्यात राहणारा रामचंद्र जाधव हा एका विवाहानिमित्त  बोथी या त्याच्या गावी आला होता. त्यावेळी त्याचा चुलतभाऊ सुनिल याच्याबरोबर त्याचे शेतीच्या प्रकरणावरुन रविवारी रात्री वाद झाला होता. या वादनंतर पुन्हा सोमवारी पैशाच्या व्यव्हारावरुन दोघांत भांडण सुरु झाले. यावेळी रागाच्या भरात रामचंद्रने सुनिलच्या पोटात सुऱ्याने अनेक वार केले यामुळे सुनिलचा जागीच मृत्यू झाला. 

चाकुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलिस निरीक्षक रामचंद्र तट यांनी घटनास्थळाला भेट दिली. चाकूरच्या ग्रामिण रुग्णालयात सुनिलचे शवविच्छेदन करण्यात आले.