Sun, Feb 17, 2019 10:11होमपेज › Marathwada › प्लास्टिक कॅरिबॅग बंदीला नागरिकांचा खो 

प्लास्टिक कॅरिबॅग बंदीला नागरिकांचा खो 

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:23PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

सरकारने प्लास्टिक पिशवी वापरावर संपूर्णपणे बंदी घातली असली तरी अद्याप सर्रासपणे प्लॅस्टिक पिशवीचा वापर व विक्री खुलेआम सुरू आहे. शासनाच्या या संपूर्ण प्लास्टिक पिशवी बंद बाबतचा धोरणात्मक निर्णय प्रत्यक्षात अद्यापही न उतरल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.

सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कॅरिबॅगच्या वापरावर व विक्रीवर बंदी घालून धोरणात्मक निर्णय घेतला. पर्यावरणाला अत्यंत धोकादायक असलेल्या या कॅरिबॅग बंद झाल्याने नागरिकांतून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तरी परंतु या निर्णयाची अंमलबजावणी अत्यंत  गांभीर्याने प्रत्यक्षात आणायला हवी आहे, पण तसे झाल्याचे दिसून येत नाही. प्लॅस्टिकच्या वस्तू व कॅरिबॅगच्या अतिरेकी वापरामुळे प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  हजारो वर्षे प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कॅरिबॅग मधून विषारी घटक हवेत मिसळून पर्यावरण मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहे. 2006 मध्ये विशिष्ट जाडीचा व उंचीच्या प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नसतानाच राज्य शासनाने पुन्हा नव्याने 18  मार्च रोजी संपूर्ण प्लास्टिक पिशव्या वापरावर व विक्रीवर बंदी घातली आहे. बंदीचा निर्णय घेऊन अनेक दिवस झाले तरी त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे.

Tags : Marathwada, people, against, Plastic, ban