Sun, Feb 17, 2019 05:00होमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

Published On: Feb 10 2018 6:10PM | Last Updated: Feb 10 2018 6:09PMभूम :  प्रतिनीधी

तालुक्यातील पाथरूड ते खर्डा जाणाऱ्या रोडवर शुक्रवार दि. ९ रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दादा माणिक आवाळे (वय ४५, रा. पारगाव, ता. वाशी) हा पाथरूड खर्डा रोडवरून चालत जात होता. तो या रोडवरील वीट भट्टीजवळ जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली.  त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अनिल उद्धव आवाळे यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा भूम पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष जोंधळे पुढील तपास करत आहेत.