Mon, Apr 22, 2019 16:40होमपेज › Marathwada › पाथरी विधानसभेवर भगवा फडकविणार : निंबाळकर

पाथरी विधानसभेवर भगवा फडकविणार : निंबाळकर

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:38AMमानवत : प्रतिनिधी

पाथरी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याचा संकल्प  पाथरी विधानसभा पक्ष निरीक्षक माजी आ. ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांशी हितगुज अभियानांतर्गत 23 फेब्रुवारी रोजी येथील नेहा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि.प.सदस्य विष्णू मांडे होते तर विचारमंचावर खा. संजय जाधव, अ‍ॅड. सुरेश बारहाते, जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे, माजी आ. मिराताई रेंगे, जि.प. सदस्य माणिकअप्पा घुंबरे, उत्तमराव कच्छवे, पं.स. सभापती बंडूनाना मुळे, उपसभापती संतोष जाधव, पं.स.सदस्य शिवाजी उक्कलकर, शिवाजी हिंगे, रवींद्र धर्मे, पंढरीनाथ घुले, रंगनाथ रोडे, दीपक बारहाते, बाळासाहेब जाधव, नगराध्यक्ष स्वामी, न.प. सदस्य अ‍ॅड. किरण बारहाते, शहराध्यक्ष राजेश कच्छवे, अनिल जाधव, नरेश गौड, माणिकराव काळे, आदी होते. पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, अनेकजण पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात मात्र एकदा सत्ता हातात आली की पक्षाला आणि कार्यकर्त्यांना विसरून जातात. यापुढे असे चालणार नाही. गद्दारांना धडा शिकवला पाहिजे.

त्यामुळे यापुढे सर्वांनी कामाला लागून स्वबळावर निवडणूक लढून ती आपण जिंकली पाहिजे. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन तालुका प्रमुख विष्णू मांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक व आभार पंढरीनाथ घुले यांनी केले. कार्यक्रमास रामेश्वर चोखट, अनिल कदम, नारायण भिसे, राम भिसे, प्रमोद तारे, विजय नांगरे, सरपंच रामप्रसाद निर्मळ, जनार्दन सोनवणे, शरद कोल्हे, पिंटू निर्वळ, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश नखाते, अंगद टेंगसे, बालासाहेब आरबाड, रविराज टाकळकर, दामोदर घुले, राजेभाऊ सोरेकर, प्रमोद चाफेकर, राजेभाऊ कुकडे, गोविंद निर्वळ, हरिभाऊ पिंपळे आदींसह मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शेतकर्‍यांसाठी खासदारांनी सोडला कार्यक्रम

कार्यक्रम चालू असताना काही शेतकरी मार्केट यार्डात कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने कार्यक्रमस्थळी आले. यावेळी मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम चालू होता. शेतकर्‍यांचा प्रश्न ऐकून खासदार सत्कार सोडून सरळ मार्केट यार्डात गेले तेथे व्यापार्‍यांशी बोलून कापसाचा भाव पाच हजार करून दिला.
कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा कुठे मांडाव्यात 
- राजेश कच्छवे, शहराध्यक्ष, शिवसेना

कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या समस्या निंबाळकर यांनी ऐकून घेण्यास सुरुवात केली. यावेळी शहराध्यक्ष राजेश कच्छवे म्हणाले मानवत नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे; परंतु निवडून आल्यानंतर मात्र पदाधिकारी अथवा शिवसैनिकांना कोणीही विचारात नाही. निवडून आलेले भाजपशी हातमिळवणी करतात त्यामुळे आम्ही कोणाचा हात धरावा असा प्रश्न आम्हाला पडत आहे. त्यावर निंबाळकर यांनी आपणच त्यांना धडा शिकवावा आम्ही आपल्या पाठिशी आहोत असे सांगितले.