Thu, Apr 25, 2019 04:11होमपेज › Marathwada › जि.प.चा  चौदा कोटींचा अर्थसंकल्प सादर

जि.प.चा  चौदा कोटींचा अर्थसंकल्प सादर

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:09AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता 14 कोटी 17 लाख 79 हजार रुपयांचा अर्थसंकल्प 23 मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. मूळ अंदाजपत्रकासह 1 लाख 65 हजार 596 रुपयांच्या शिलकीच्या अंदाजपत्रक अर्थसंकल्पाचे वाचन सभापती अशोक काकडे यांनी केले. यास सभागृहाने सर्वानुमते अनुमती दिली. यात सर्वाधिक दळणवळण व इमारत यावर 4 कोटी 34 लाख 54 हजाराची तरतूद केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या कै.बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात अध्यक्षा उज्ज्वला राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सभापती श्रीनिवास जोगदंड,  ऊर्मिलाताई बनसोडे, राधाबाई सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर यांची उपस्थिती होती. या अर्थसंकल्पात चौदा बाबींवर नियोजन करण्यात आले आहे. 

सदरील जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्‍नातील अर्थसंकल्प सादर झाला. यात उत्पन्‍नासाठी मिळणारा सामान्य उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक शुल्क अनुदान इत्यादी बाबींचा यात समावेश आहे. याशिवाय पाणीपट्टी, अभिकरण आकार, वन महसुल अनुदान, व्यवसाय कर अनुदान, व्याज, दवाखाना शुल्क, निविदा विक्रीतून मिळणारे उत्पन्‍न, निवासस्थानाचे भाडे यांचेही जि.प.ला वैयक्‍तिक उत्पन्‍न मिळते. बैठकीस राकाँचे गटनेते अजय चौधरी, शिवसेना गटनेते राम पाटील, काँगे्रसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड यांच्यासह सर्वच सदस्यांची उपस्थिती होती.