Tue, Jul 23, 2019 11:49होमपेज › Marathwada › परभणीचे उपजिल्हाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

परभणीचे उपजिल्हाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Feb 20 2018 9:22PM | Last Updated: Feb 20 2018 9:26PMपरभणीः प्रतिनिधी

परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना १ लाख रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सुदर्शन गायकवाड असे त्या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. 

ब्राह्मण गाव येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित केलेला अहवाल पाठवण्यासाठी लाचेची मागणी केली होती. स्वतःच्या दालनातच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. याबाबत मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.