Thu, Nov 22, 2018 00:32होमपेज › Marathwada › वीज कोसळ्याने शेतकरी गंभीर तर बैल दगावला

वीज कोसळ्याने शेतकरी गंभीर तर बैल दगावला

Published On: May 18 2018 8:03PM | Last Updated: May 18 2018 8:03PMपरंडा : प्रतिनिधी 

परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी येथे आज शुक्रवार दि. १८ रोजी सायं. ५ च्या दरम्यान शेतामध्ये ऊस पिकाची मशागत करत असताना विज कोसळून शेतकरी गंभीर जखमी झाला, तर एक बैल दगावला आहे.

परंडा तालुक्यातील जाकेपिंपरी येथील कुंडलीक बारसकर यांच्या शेतातील ऊसाच्या पिकाची मशागत शेतकरी कुंडलीक बारसकर व विनायक थिटे हे दोघे बैलजोडीच्या सहाय्याने करत होते. दरम्यान मान्सुनपूर्व आवकाळी पावसाला सुरवात होऊन यामध्ये सुसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट चालु झाल्याने दोन्ही शेतीकाम बंद करण्याच्या विचारात असतानाचं अचानक विज कोसळून शेतकरी कुंडलीक बारसकर (वय ५५) हे गंभीर जखमी झाले, तर विनायक रिटे यांचा ४० ते ५० हजाराचा बैल जाग्यावरच दगावला आहे.

कुंडलीक बारसकर यांना पुढील उपचारांसाठी बार्शी येथील खाजगी रूग्‍नालयात दाखल करण्यात आले आहे.