Sun, Mar 24, 2019 23:35
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › वैद्यनाथ साखर कारखान्यात अपघात, ११ जण जखमी

बीड : वैद्यनाथ कारखान्यात अपघात, ११ जखमी

Published On: Dec 08 2017 5:30PM | Last Updated: Dec 08 2017 5:30PM

बुकमार्क करा

परळी-वैजनाथ : प्रतिनिधी

येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उत्पादन विभागात ज्यूस सेक्शनमध्ये दुपारी २.३० वाजता टाकी फुटून अपघात झाला. यामध्ये गरम रसमिश्रीत पाणी पडून ११ जण भाजले असून, जखमी कामगारांना परळीत प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई व लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

वैद्यनाथ साखर कारखान्यातील उत्पादन विभागात ज्यूस सेक्शनमध्ये असलेल्या उसाचा रस व पाणी उकळून वेगळे करणाऱ्या टाक्यांपैकी एक टाकी अचानक फुटली. यावेळी येथे काम करीत असलेले ११ कामगार भाजून जखमी झाले. जखमी कामगारांना परळीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई व लातूर येथे पाठविण्यात आले आहे. जखमींमध्ये अभियंता धनाजी देशमुख, लहू डाके, सुनील भंडारे, सुमीत भंडारे, आदनाक, संघापुडे हनुमंत, गौतम घुमरे, महादेव मुंडे आदींचा समावेश आहे.