Wed, Aug 21, 2019 17:38



होमपेज › Marathwada ›  परळी वैजनाथ : श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी (Video)

 परळी वैजनाथ : श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी (Video)

Published On: Aug 13 2019 12:03PM | Last Updated: Aug 13 2019 12:38PM




परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आज दुसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच दर्शनार्थी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला. दिवसभरात विविध ठिकाणच्या हजारो भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. 

पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत दररोज देशातील विविध ठिकाणचे भाविक दाखल होत आहेत. आज दुसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक  झाले. काल रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरू झाले. धर्मदर्शन रांगेत मध्यरात्री पासूनच भाविकांचा मोठा ओघ पहावयास मिळाला तर सकाळी यामध्ये मोठी गर्दी झाली होती. दर्शन पास सुविधेच्या रांगेतून दर्शनासाठी सकाळच्या सत्रात जास्त गर्दी झाली होती. दरम्यान, मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. दिवसभरात हजारो भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.