Sun, Sep 23, 2018 13:49



होमपेज › Marathwada › बीडः रेल्वेरुळावर सिमेंट ब्लॉक, घातपाताचा संशय

बीडः रेल्वेरुळावर सिमेंट ब्लॉक, घातपाताचा संशय

Published On: Jan 04 2018 2:39PM | Last Updated: Jan 04 2018 2:39PM

बुकमार्क करा




परळी : प्रतिनिधी 

परळीत रेल्वे रूळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मालेवाडीहून परळीला येणाऱ्या मालगाडीला होणारा मोठा अपघात टळला. परळी रेल्वे स्टेशनपासून सात किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या मार्गावर परळी-हैद्राबाद रेल्वे येण्याआधी एक मालगाडी परळीकडे आली. त्या मालगाडीने हा सिमेंट ब्लॉक किमान शंभर फूट ओढत नेला.

या मालगाडीमुळे रेल्वे ट्रॅकच्या चाव्याही निखळून पडल्या. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. याच मार्गावरुन 15 ते 20 मिनिटं आधी बंगळुरु-नांदेड ट्रेन धावली होती. रेल्वेरुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यामागे घातपात करण्याचा उद्देश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सिमेंट ब्लॉक उचलण्यासाठी किमान पाच ते सहा जण लागतात. त्यामुळे अनर्थ घडवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा दाट संशय आहे.