Tue, May 21, 2019 04:45होमपेज › Marathwada › परळी जिल्हा निर्मितीची मागणी 

परळी जिल्हा निर्मितीची मागणी 

Published On: Feb 23 2018 1:41AM | Last Updated: Feb 23 2018 1:38AMपरळी : प्रतिनिधी

नवीन जिल्हा निर्मितीमध्ये बीड जिल्ह्याचे विभाजन करताना परळी हा नवीन जिल्हा घोषित करावा अशी मागणी परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाव्दारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी येथे जिल्ह्यातील एकमेव दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वे स्टेशन आहे. यामुळे राज्यातील इतर शहरांशी आर्थिक व व्यवसायिक दृष्ट्या सुलभ संपर्क साधला जातो. परळी हा जिल्हा व्हावा ही अत्यंत जुनी मागणी आहे. जिल्ह्यासाठी लागणार्‍या सर्व सुविधा या ठिकाणी आहेत. वीज निर्मिती केंद्र, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ तीर्थ क्षेञ हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्व परिचित आहे. येथे निर्माण होणार्‍या विजेचा पुरवठा राज्यभरात केला जातो, तसेच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेञात उज्वल यश संपादन करून शहराचे नावलौकीक झाले आहे. पाटबंधारे, कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय कार्यालय परळी येथे आहे, तसेच 100 खाटांचे अद्यावत उपजिल्हा रुग्णालय, तालुका सत्र न्यायलय व शासनाचे इतर महत्वपूर्ण कार्यालय ही परळी  येथे उपलब्ध आहेत. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष आयूब पठाण, न. प. स्वच्छता सभापती विजय भोयटे, सुरेश टाक, नगरसेवक जयपाल लाहोटी, शंकर आडेपवार, अनिल अष्टेकर, सय्यद सिराज, अर्चना  रोडे, अन्नपूर्णा जाधव, वैशाली तिडके, पांडुरंग गायकवाड, दत्ताभाऊ सावंत, किशोर केंद्रे, अनंत इंगळे, सचिन जोशी, जावेद कुरेशी, अजीज कच्छी, जमील अध्यक्ष, गोविंद कुकर, शेख शम्मो, सुरेश नानावटे,  महेंद्र रोडे, रवी मुळे, सचिन मराठे, शंकर कापसे, बालाजी वाघ, सुरेश गित्ते, वाजेद खान, शकील कच्छी, धोंडीराम धोत्रेे, बळीराम नागरगोजे, अमर रोडे, नरेश सुरवसे, तक्की खान, जयदत्त नरवटे, नाजेर हुसेन, प्रताप समींदरसवळे, जावेद कुरेशी, शिवा होके, मंजीत सुगरे, उमर बागवान, रवी आघाव, राज जगतकर, गफार काकर, भागवत गित्ते, कृष्णा डुबे आदींची उपस्थिती होती.