Sat, Jul 20, 2019 10:44होमपेज › Marathwada › शिवसेनेचा मनपाला घेराव

शिवसेनेचा मनपाला घेराव

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:11AMपरभणी : प्रतिनिधी

रमाई घरकूल योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील लाभार्थ्यांना जाणिवपूर्वक वगळण्याचे षड्यंत्र शहर महानगरपालिकेने रचले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून स्लम भाग वगळल्याच्या निषेधार्थ शिवसेना आ. डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात 30 जून रोजी दुपारी 1 वाजता मनपाला घेराव घालण्यात आला. या आंदोलनाने मनपा प्रशासनाला चांगला हादरा बसला असून लवकरच मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

यावेळी आ. डॉ. राहुल पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, लोकनेते विजय वाकोडे, उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, नगरसेवक सुशील कांबळे, माजी विरोधी पक्षनेत्या अंबिकाताई डहाळे, सुनीता कांबळे, नंदू अवचार, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, प्रशास ठाकूर, संजय गाडगे, नंदू शिंदे, बाळासाहेब पानपट्टे, रामजी तळेकर, हसाजीराव गोडबोले, बाळराजे तळेकर आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळा परिसरातून घेराव आंदोलनासाठी मोर्चा मनपाकडे निघाला. हजारो गोरगरिबांनी 5 ते 6 वर्षांपासून घरकुलासाठी मोलमजुरीतून पैसे खर्च करत मनपा प्रशासनाला अर्ज दिले. योजनेचा 53 कोटी रुपयांचा निधी पडून आहे. रमाई घरकूल योजनेच्या अटींमध्ये बदल करत 2011 च्या जनगणना निकषाचे कारण देत योजनेतून दारिद्य्ररेषेखालील लाभार्थींना हेतूपुरस्सर वगळण्याचे षड्यंत्र रचले. पंतप्रधान आवास योजनेत शहरातील हजारो झोपडपट्टीधारक व स्लम भागातील नागरिकांचे अजर्र् मनपा प्रशासनाने  घेतले. एन. ए. ले-आऊट प्लॉट नसल्याचे कारण समोर करत सर्व स्लम भाग वगळला. योजनेत केवळ 500 श्रीमंत व सधन एन. ए. ले-आऊट प्लॉटधारकांचा  प्रस्ताव  शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. यामुळे शिवसेना आ. डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली  मनपाला घेराव आंदोलन झाले.