Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Marathwada › गाव पाणीदार करण्यासाठी सारेच सरसावले

गाव पाणीदार करण्यासाठी सारेच सरसावले

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 29 2018 11:48PMपरभणी : प्रतिनिधी

अभिनेता अमीर खान आणि दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पाणी फाउंडेशनच्या चळवळीत जिंतूर तालुक्यातील आसेगाव सहभागी झाले आहे़   सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावात विविध प्रकारची कामे श्रमदान व लोकसहभागातून केली जात आहेत. 

जिंतूर तालुक्यातील 110 गावांमध्ये पाण्याची चळवळ उभी राहिली आहे. आसेगावात उद्धवराव पवार, नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सीमा नितीन पवार, उपसरपंच राजेभाऊ दळवे व सर्व सदस्यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ कामाला लागले आहेत. ग्रामस्थांनी गावालगतची झाडेझुडूपे तोडून जमीन स्वच्छ केली आहे़  54 हेक्टर गायरान जमिनीवर सलग समतल चर (सीसीटी) खोदून गावाला पाणीदार करण्यासाठी गावकरी प्रयत्नांची  पराकाष्ठा करीत आहेत़ गावातील महिला, पुरुष, अबाल-वृद्ध हातात टिकाव, फावडे आणि टोपले घेऊन श्रमदान करण्यासाठी दररोज सकाळी 4 तास श्रमदान करीत आहेत़