Sun, Feb 17, 2019 07:02होमपेज › Marathwada › लातुरात पद्मावत शांततेत

लातुरात पद्मावत शांततेत

Published On: Jan 25 2018 3:48PM | Last Updated: Jan 25 2018 10:54PMलातूर : प्रतिनिधी

देशात अस्वस्थता निर्माण कलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाचा पहिला दिवस लातुरात शांततेत गेला. चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांनी गर्दी केली होती. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहास मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

बुधवारी लातुरच्या तीन थिएटरमध्ये अचानक रिव्ह्यू शो दाखवण्यात आला. यावेळी प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पीव्हीआर, रमा आणि यशोदा या तिनही चित्रपटगृहांत त्याचे खेळ सुरु झाले असून प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला आहे. बुकींगलाही प्रतिसाद आहे. 

दरम्यान, लातुरात या चित्रपटाच्या विरोधात दोन आंदोलने झाली होती.  आंदोलनात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी बोलाऊन त्यांची चौकशी केली. तसेच त्यांना समज देऊन सूचनाही केल्या.