Sat, Nov 17, 2018 23:15होमपेज › Marathwada › विनयभंग प्रकरणी लाच घेताना हवालदाराला पकडले

विनयभंग प्रकरणी लाच घेताना हवालदाराला पकडले

Published On: May 02 2018 5:29PM | Last Updated: May 02 2018 5:29PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

विनयभंगाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणारा पोलिस हवालदार जाळ्यात सापडला. त्याच्या मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांनी सांगितले, की संबंधित तक्रारदाराविरूध्द विनयभंगाचा तक्रार अर्ज उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात आला होता. त्या अर्जानुसार वरिष्ठ अधिकार्‍याला बोलून गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदार नवनाथ चंद्रकांत भोरे याने 30 हजार रूपयांची लाच मागितली होती. अखेर 25 हजारांवर तडजोड झाली. यातील 10 हजार रूपये पूर्वीच त्याने स्वीकारले. उर्वरीत 15 हजार रूपये मंगळवारी दि. २ रोजी देण्याचे ठरले होते. दरम्यानच्या काळात संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यांनीही याबाबत खातरजमा करून आज बार्शी नाका येथील एका हॉटेलात सापळा लावून मध्यस्थ प्रकाश बिरंजे (रा. अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद) याच्या मार्फत 15 हजारांची लाच स्वीकारताना दोघांनाही अटक केली. पोलिस निरीक्षक बी. जी. आघाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.