Tue, Apr 23, 2019 07:56होमपेज › Marathwada › माळरानावर वीस एकरांत फुलविले नंदनवन

माळरानावर वीस एकरांत फुलविले नंदनवन

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 9:26PMबीड : प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील शेतकरी संदीप हिंगमिरे व त्यांच्या भावाने वीस एकर माळरानावर नंदनवन फुलविले आहे. डोंगरपट्ट्यात असलेल्या या माळरानावर त्यांनी आतापर्यंत पाच वर्षांत तब्बल 55 लाख रुपयांचे कांद्याचे पीक काढले आहे. 

पिंपळगाव घाट येथील शेतकर्‍यांची सर्व शेती डोंगरावर, गावापासून काही अंतरावर आहे. येथून जवळच केळचा तलाव आहे. चांगला पाऊस झाला आणि तलावात पाणी साठा आला तरच या भागातील शेती पिकते अन्यथा पिण्याच्या पाण्याची पंचाईत होते.आष्टी पासून 52 कि. मी. अंतरावर व अहमदनगर पासून पूर्वेस 22 कि. मी. डोंगराच्या कुशीत आष्टी तालुक्यात पिंपळगाव घाट 1100 लोकवस्तीचे गाव वसलेले आहे. शिवमूर्ती  हिंगमिरे यांना संतोष, संदीप व दिलिप अशी तीन मुले, पैकी मोठा मुलगा वैजापूर येथे शिक्षक आहे. संदीपचे शिक्षण सातवी पर्यंत झाले.

तलावाजवळील विहिरीतून डोंगरावर 70  फूट उंचीवर पाइपलाइनचे पाणी नेले आहे. गेल्या दहा वर्षांपासून शेतात फक्त नाशिक कांदा (लाल कांदा)  व भुईमूग ही पिके घेतली जातात, अणि कांदा काढल्यानंतर उन्हाळी बाजरी दोन वर्षांपासून घेतली जाते. सध्या चार एकर डाळींब देखील लावले आहे. 15 एकर शेतीत घेतलेल्या कांदा मशागतीसाठी एकही मजूर लावला नाही, सर्व शेती घरीच केली. कांदा लागवड करत थोड्याफार प्रमाणात सुपरफॉसपेट, युरिया व एकच फवारणी केली. यातून त्यांना  55 लाखांचे उत्पन्न मिळाले. नियोजनबद्ध शेती केल्याने यश मिळाल्याचे संतोष हिंगमिरे यांनी सांगितले. 
पंचवीस वर्षांपूर्वी डोंगराच्या पायथ्याशी कोपी, शिवमूर्ती यांची सर्व शेती डोंगराची त्यामुळे तेथे काहीच पिकत नव्हते. पंचवीस वर्षांपूर्वी डोंगराच्या पायथ्याशी कोपी करून कुटुंब रहात होते. डोंगरालगत शेती असल्याने काही उत्पन्न मिळत नाही. शेवटी पदवीनंतर संतोष यांनी अहमदनगर येथे जाऊन काही दिवस केळी विकण्याचा व्यवसाय केला. या व्यवसायापेक्षा शेती उत्तम असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्तव:ची शेती फुलविली.