Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Marathwada ›  शिवशाही बस पलटी होऊन  शिक्षिका ठार 

 शिवशाही बस पलटी होऊन  शिक्षिका ठार 

Published On: May 01 2018 1:51PM | Last Updated: May 01 2018 1:51PMकेज : प्रतिनिधी

लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस होळ जवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात बसमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, बसखाली अडकलेल्या शिक्षिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रेणुका कल्याण माळी (वय 30, रा चिंचोली माळीतर) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍या शिक्षेकेचे नाव आहे. या अपघातात नऊ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लातुर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास झाला. या आधीही रस्‍त्‍याच्या कामामुळे शिवशाही बस खड्यात जाऊन अपघात झाला होता. मात्र, सुदैवाने त्यात कोणत्याही जीवीतहानी झाली नव्हती. 

राष्ट्रीय महामार्गाचे लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा पर्यंत ठिकठिकाणी काम सुरु आहे. मात्र, या रस्त्यावरुन वाहतूक करणार्‍या वाहनासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहित. मंगळवारी पहाटे लातूर येथून औरंगाबादकडे जाणारी बस समोरुन येणाऱ्या वाहनास बाजू देत असताना रस्‍त्‍याकडेलील खड्यात जावून पलटी झाली, या बसमध्ये सोळा प्रवाशी होते. त्‍यातील काही प्रवाशी बसच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले तर, काही प्रवासी बसमध्येच अडकून राहीले. यावेळी रेणुका माळी आणि अमर जियाउद्दीन सिद्दीकी (वय 9) हे पलटी झालेल्या बसच्या खाली सापडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी बसला जॅक लावून उचलण्यात आले यासाठी पाऊन तासाचा कालावधी लागला बसचा भाग कंबरेवर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या रेणुका यांचा उपचारा दरम्यान अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत्यू झाला. तर, जखमी अमर जियाउद्दीन सिद्दिकी यास उपचारासाठी लातुर येथे हलविण्यात आले आहे.

या बस अपघातात बसचालक भागवत दादाराव केंद्रे (वय 26 वर्षे, रा. उंडेगाव), पांडुरंग भीमराव म्हेत्रे (वय 56 वर्षे रा, केज), राजू सानुजी इवले (वय 26 रा औरंगाबाद), सतिश गणपत गव्हाणे (वय 30 रा बोरगाव) हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 

Tags : latur aurangabad shivshahi bus, accident, kej