Thu, Apr 25, 2019 15:37होमपेज › Marathwada › एकाच दिवसात ढालेगाव बंधारा 75 टक्के भरला

एकाच दिवसात ढालेगाव बंधारा 75 टक्के भरला

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:23AMपाथरी : गोदावरी नदी पात्रातील ढालेगाव येथील बंधारा 16 ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसाने 75 टक्के भरला आहे. सद्यस्थितीत बंधार्‍याची पाणीपातळी 393.50 मीटर असून 11.35 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. अजूनही पाण्याची आवक सुरूच असल्याचे दिसत आहे. या भागात एका दिवसात 100 मिमी पाऊस पडला.  यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.

पाथरी तालुक्यात 16 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. दिवसभर पाऊस पडला तसेच 17 ऑगस्ट रोजी पहाटेपर्यंत सुरूच होता. एका दिवसात तालुक्यात 100 मी. मी. पाऊस झाला तर पाथरी मंडळात 142 मी. मी.ची नोंद झाली आहे. संततधार पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहु लागल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी ढालेगाव येथील बंधारा 75 टक्के भरला होता. या बंधार्‍याची क्षमता 14.48 द.ल.घ.मी.असून सध्या बंधार्‍यात एकूण पाणीसाठा 11.35 एवढा झाला आहे. पाणीपातळी 393.50 मीटर असून 9.98 जीवंत पाणीसाठा आहे. गतवर्षी 19 ऑगस्ट रोजी बंधारा भरल्याने गेट उघडून पाणी सोडण्यात आले होते. आणखी पाण्याची आवक सुरू असून दिवसभर पाऊस राहिला तर बंधारा पूर्ण भरला जाईल असे वास्तव दिसत आहे.