Wed, Jul 17, 2019 20:57होमपेज › Marathwada › मराठवाड्यात गारांसह अवकाळी पावसाची 'बरसात'

मराठवाड्यात गारांसह अवकाळी पावसाची 'बरसात'

Published On: Feb 11 2018 9:29AM | Last Updated: Feb 11 2018 9:29AM बीड : प्रतिनिधी

मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्हातील अनेक ठिकाणी रविवारी पहाटे अनेक  गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली धांदल उडाली. शेतात काढून ठेवलेल्या धान्यांचे नुकसान झाले आहे. राक्षस, भुवन, गेवराई आणि  अंबर शहागड या भागात पावसाचा जोर होता. अनेक ठिकाणी सकाळ पासून ढगाळ वातावरण असून सूर्य दर्शन झालेले नाही.

हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच पावसाचा इशारा दिला होता. अवकाळी पावसाने पीकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  सेनगाव तालुक्यातील बन येथे सकाळी  जवळपास पंधरा मिनिटे गारांचा पाऊस पडला. परभणी जिल्ह्यात  येलदरी, बोरी, गंगाखेड परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने  गारठा वाढला आहे.