Fri, Sep 20, 2019 06:54



होमपेज › Marathwada › निलंगा- लातूर मार्गावर पुन्‍हा अपघात, ३ ठार

निलंगा- लातूर मार्गावर पुन्‍हा अपघात, ३ ठार

Published On: Dec 02 2017 2:26PM | Last Updated: Dec 02 2017 2:26PM

बुकमार्क करा





लातूर : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वीच निलंगा- लातूर मार्गावर मोठा अपघात झाल्‍यानंतर आता पुन्‍हा याच मार्गावर अपघात झाला आहे. चलबुर्गा पाटीनजीक शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजण्‍याच्या सुमारास भरधाव ट्रक व एसटी बसची धडक झाली. या अपघातात तिघे जागीच ठार झाले. तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी रात्री ११:१० वाजता लातूर बसस्थानकातून हैद्राबादला जाण्यासाठी लातूर आगाराची एम एच २० बीएल ३५८७ या क्रमांकाची बस निघाली. एसटी चलबुर्गापाटीनजीक आली असता तिची व एपी २४ व्ही ८८३८ या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. यात बसमधील अंकिता अमित भोज (वय २२, रा. निलंगा), आयेशा इस्माईल बागवान (वय ५० रा. हैद्राबाद) बापुसाहेब बिडवे (वय ५०, रा. अडसुळ ता. कळंब) हे जागीच ठार झाले. तर अमित रामकृष्ण भोज (वय ४०, रा. निलंगा), मोहम्मद इस्माईल बागवान (वय ५५, रा. हैद्राबाद) सोनू किसन काळे ( वय १८, रा. ढोकी) किशोर गोरख डोंगरे ( वय ४०, रा उदगीर) , ओमप्रकाश जगन्नाथ पाटील (वय ३५, रा.यल्लोरी, जी. लातूर) सुनिल सतिश शिंदे (वय १०, रा. ढोकी जि. उस्मानाबाद), अनिस मन्सूर शेख (वय ३५ , रा. लातूर) व अन्य एक जखमी झाले.
अपघाताची माहिती समजताच चलबुर्गा पाटीवर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले. औशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, लातूर ग्रामी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, सहाय्‍यक पोलिस निरीक्षक हनुमंत बांगर, भोसले व पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 
 

१४ दिवसांत १३ ठार

लातूर – निलंगा मार्गावरील १४ दिवसांतील हा तिसरा मोठा अपघात आहे. १८ नोव्हेंबर रोजी ट्रक व बसच्या अपघातात ७ ठार ३६ जण जखमी झाले होते. २६ नोव्हेंबरला कार अपघातात तीन ठार झाले होते.
 













WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex