Mon, Apr 22, 2019 22:03होमपेज › Marathwada › नांदेड येथे अपघातात नवदाम्पत्य ठार

नांदेड येथे अपघातात नवदाम्पत्य ठार

Published On: Apr 23 2018 11:14AM | Last Updated: Apr 23 2018 11:14AMबिलोली(जि. नांदेड) : प्रतिनिधी

कासराळी ते बिलोली मार्गावर ऑटो आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या अपघातात नवदाम्‍पत्‍य जागीच ठार झाले आहे. शिवलिंग कुलके (वय, २४ रा. जळकोट ता.उदगीर) आणि कोमल यशवंतकर (वय, २०, रा.चौफाळा नांदेड) असे मृत्‍यू झालेल्‍या नवदाम्पत्याचे नाव आहे. 

शिवलिंग आणि कोमल यांचे १९ एप्रिल रोजी लग्न झाले होते. लग्‍नानंतर देव दर्शनाला जाताना हा अपघात झाला. यात शिवलिंग आणि कोमल जागीच ठार झाले तर, अन्य तीन जण जखमी झाले. शिवराज मंटाळकर(वय, ३०), कृष्णा मंटाळकर(वय, १६) आणि सविता बेल्लूरकर (३५) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर बिलोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍यांना नांदेडला हलवण्यात आले आहे.