Tue, May 21, 2019 18:19



होमपेज › Marathwada › अजित पवार यांच्या सभेत पोलिस निरीक्षकास शिवीगाळ

अजित पवार यांच्या सभेत पोलिस निरीक्षकास शिवीगाळ

Published On: Jan 19 2018 6:12PM | Last Updated: Jan 19 2018 6:12PM



बीड  : प्रतिनिधी 

बीड येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत पोलिस निरीक्षकास राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेखा फड यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी फड यांच्याविरूद्ध शुक्रवारी बीड शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

बीड येथे बुधवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत हल्लाबोल यात्रेची सभा झाली. या सभेत रेखा फड यांनी पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांना भाषणातून शिवीगाळ केली. शिरीष हुंबे  यांच्या तक्रारीची चौकशी करून, त्यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास फौजदार जोगदंड करीत आहे. रेखा फड यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे.