भाजपचा प्रचार करणार्‍या 'त्या' कर्मचार्‍यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी

Last Updated: Oct 18 2019 6:12PM
Responsive image

Responsive image

परळी : प्रतिनिधी

परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचार यंत्रणेकडून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ बँक, वैद्यनाथ देवस्थान, वैद्यनाथ महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांचा प्रचारासाठी वापर केला जात असून, निवडणूक आयोगाच्या आचार संहितेच्या तत्वानुसार असा प्रचार करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहकारी संस्था, देवस्थान, बँका, शैक्षणिक संस्थांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करता येत नाही. असा वापर कोणी करत असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरूध्द कारवाई केली जाते. मात्र परळीत सर्रास भाजपकडून त्यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखाना, वैद्यनाथ बँक, वैद्यनाथ महाविद्यालय, वैद्यनाथ देवस्थान, अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचार्‍यांना प्रचाराला जुंपले जात आहे, त्यामुळे या संस्थांमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रचार करणार्‍या कर्मचार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, संस्था चालक, संस्था प्रमुखांवरही कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.

LIVE : तब्बल पाच महिन्यांनी क्रिकेट सुरु पण..


कोरोना संकटात परीक्षा कशा घ्यायच्या हे युजीसीने सांगावे : उदय सामंत


नीरव मोदीला ईडीचा दणका; ३२९ कोटींची संपत्ती जप्त


पिंपरीत आणखी २७ पोलिस कोरोनाबाधित


आठ पोलिसांच्या हत्याकांडात पोलिसच घरभेदी? दोन अधिकाऱ्यांना अटक


कोरोना रूग्ण बरे होण्यात हिंगोली राज्यात प्रथम


सीबीएसईकडून अभ्यासक्रमातून थेट ‘धर्मनिरपेक्षता, लोकशाही हक्क, नागरिकत्व’ धड्यांनाच कात्री!


चांदोली धरण निम्मे भरले; वीजनिर्मितीची दोन्ही जनित्रे सुरू 


माढा : दगड अकोलेत एकाच घरातील तीन बाधित


'मालेगाव 'पॅटर्न' माहिती नाही, ट्रेसिंग- टेस्टिंग न वाढवल्यास दुसरी लाट येईल'