Sun, Jul 21, 2019 10:48होमपेज › Marathwada › हिंगोली  : नायब तहसीलदाराला लाच प्रकरणी अटक

हिंगोली  : नायब तहसीलदाराला लाच प्रकरणी अटक

Published On: Mar 03 2018 7:21PM | Last Updated: Mar 03 2018 7:21PMहिंगोली : प्रतिनिधी

वाळुचे ट्रॅक्टर सोडवण्याचे पत्र देण्यासाठी कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांनी तक्रारदाराकडे दहा हजारांची मागणी केली होती. पैकी दोन हजार रूपये तक्रारदाराने  दिले. तर उर्वरित सात हजार रूपये लाचेची मागणी करणार्‍या नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्या विरोधात कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत कळमनुरी पोलिसांनी बोथीकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. ही कार्यवाही एसीबीने शनिवारी केली.

कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्या पथकाने ट्रॅक्टर क्र.एमएच 29 एके 2542 हा वाळुचा टॅ्रक्टर पकडला होता. त्यानंतर आ.बाळापूर पोलिस ठाण्यात सदर ट्रॅक्टर लावण्यात आला होता. तक्रारदारावर अतिरिक्‍त एक ब्रास रेती घेवून जाण्याचा दंड लावला होता. तो तक्रारदाराने रितसर भरला. मात्र सदरील ट्रॅक्टर सोडण्यासाठीचे पत्र देण्यासाठी नायब तहसीलदारांनी तक्रारदारांकडे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानुसार दोन हजार रूपये देण्यात आले. तर उर्वरित रक्‍कम दि.5 फेब्रुवारी रोजी घेवून येण्यास सांगितले. या संदर्भात संबंधीत तक्रारदारांनी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडे रितसर तक्रार दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.6 फेब्रुवारी रोजी एसीबीने पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी केली. यामध्ये नायब तहसीलदारांनी तक्रारदारांकडून ट्रॅक्टर सोडण्यासाठी सात हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे पदाचा दुरूपयोग करून स्वत: चा आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने लाचेची मागणी केली व स्विकारण्याचे कबुल केले. या प्रकरणी नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्या विरूध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात गुरनं 62/2018 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटकही करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही एसीबीचे पोलिस अधीक्षक संजय लाटकर, पोलिस उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी.एल.पेडगांवकर, कपिल शेळके, पोलिस नाईक बाबु गाजुलवार, एकनाथ गंगातिर्थ, जगन्‍नाथ अनंतवार, पोलिस कॉन्स्टेबल अंकुश गाडेकर, चालक पोलिस नाईक शेख मुजीब आदींनी केली आहे.