बीड : उत्तम हजारे
संत भगवानबाबा यांनी 1934 मध्ये सुरू केलेला नारळी सप्ताुह आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. यावर्षीचा 85 वा सप्ताह शिरूर तालुक्यातील तागडगाव येथे होणार असून 2033 मध्ये शंभरावा नारळी सप्ताह भगवानगडावर होणार आहे.
जिल्ह्यात विविध गडांच्या माध्यमातून अध्यात्मिक परंपरा वाढीस लागलेली आहे. अध्यात्माबरोबरच सामाजिक प्रबोधनाचे काम संत-महंतांनी केले आहे. संत भगवानबाबा यांनी भगवानगडाच्या स्थापनेपूर्वी नारायणगडावरून नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली होती. सवार्र्ंत पहिला सप्ताह पौंडुळ येथे 1934 मध्ये झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी विविध गावांनी या सप्ताहाचे नारळ घेतले व सप्ताहाचे यशस्वी नियोजन केले. बीड जिल्ह्यासह शेजारच्या नगर, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विविध गावांत हे सप्ताह झालेले आहेत. सप्ताहाचे नारळ घेण्यासाठी विविध गावांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते. सध्या 2028 पर्यंतचे सप्ताहाचे नारळ देण्यात आलेले आहेत.
Tags : Marathwada, Marathwada News, narali Weeks, Century, Goes to the Festival