Tue, Oct 24, 2017 16:46होमपेज › Marathwada › नांदेड महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

नांदेडमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

Published On: Oct 12 2017 9:01AM | Last Updated: Oct 12 2017 3:30PM

बुकमार्क करा

नांदेड : प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेवर पुन्हा एकादा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. पालिकेतील 81 पैकी 71 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. पालिकेत कमळ उमलण्यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांना देखील प्रचारात उतरवले होते. मात्र भाजपची मोठी निराशा झाली. पक्षाला 6 जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेला दोनच जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत 13 जागा जिंकणाऱ्या एमआयएमला एकही जागा मिळवता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील पालिकेत खाते उघडता आले नाही.

संबंधित बातमी: खालच्या पातळीवरील प्रचाराला उत्तर : अशोक चव्हाण

पालिकेच्या 20 प्रभागातील 81 जागांसाठी 60 टक्के मतदान झाले होते. सरकारी तंत्रनिकेतनमध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच काँग्रेसने आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्यातासात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळेल असे वाटले होते. मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता मिळवली.

याआधी 2012मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 40 जागांवर विजय मिळवला होता. 15 जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर 13 जागांसह एमआयएम तिसऱ्या स्थानावर होती. राष्ट्रवादीला 10 तर भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या.

Live अपडेट

> काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 43 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार

> भाजपसमोर चव्हाणांची अग्निपरीक्षा

> सुरुवातीच्या अर्ध्या तासाचे कल- 20 जागांचे कल हाती- काँग्रेस 10, भाजप 8, शिवसेना 2 व एमआयएमला 2 जागांवर आघाडी

> राष्ट्रवादीने अद्याप खाते उघडले नाही

> काँग्रेस 10, भाजप 8, शिवसेना 2 व एमआयएमला 2 जागांवर आघाडी

> काँग्रेस 16, भाजप 4, व एमआयएमला 1 जागेवर आघाडी

> काँग्रेस 19, भाजप 2 व शिवसेनेला 1 जागेवर आघाडी

> काँग्रेस 24, भाजप 1 व शिवसेनेला 2 जागेवर आघाडी

> काँग्रेस 25, भाजप 4 जागेवर आघाडी

> काँग्रेसची 26 जागांवर आघाडी

> प्रभाग क्रमांक 5 आणि 11 मध्ये चारही जागांवर काँग्रेसचे उमेदवारी विजयी

> प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपच्या शांता गोरे विजयी

> 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी

> जाहीर झालेल्या 17 पैकी 16 जागांवर काँग्रेसचा तर एका जागेवर भाजपचा विजय

> 21 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी

> जाहीर झालेल्या 23 पैकी 22 जागांवर काँग्रेसचा तर एका जागेवर भाजपचा विजय

> काँग्रेसला 31 तर भाजप, शिवसेना प्रत्येकी 1 एका जागेवर विजय

> भाजपला दुसरे यश, वैशाली देशमुख प्रभाग क्रमांक 6मधून विजयी

> काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 43 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार