होमपेज › Marathwada › नांदेड : किनवट नगराध्यक्षपदी भाजपचे मच्छेवार

नांदेड : किनवट नगराध्यक्षपदी भाजपचे मच्छेवार

Published On: Dec 14 2017 1:54PM | Last Updated: Dec 14 2017 1:54PM

बुकमार्क करा

नांदेड : प्रतिनिधी 

तेलंगणाच्या सीमेरेषेवर असलेल्या किनवट नगरपालिका निवडणुकीत भाजपने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवला. नगराध्यक्षपदी भाजपेचे उमेदवार आनंद मच्छेवार विजयी झाले.

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी दि. 13 रोजी मतदान झाले होते. आज गुरुवारी दि.14 रोजी सकाळी मतदान मोजणीस सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे सुरुवातीपासून आघाडी घेत 17 पैकी 9 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने ६, काँग्रेसने २ तर  एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला.