Wed, Nov 21, 2018 23:29होमपेज › Marathwada › नांदेड : हाडोळीच्या शाळेतील ७० बालकांना विषबाधा

नांदेड : हाडोळीच्या शाळेतील ७० बालकांना विषबाधा

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 12:43PMभोकर: प्रतिनिधी

तालुक्यातील हाडोळी येथील प्राथमिक शाळेत वर्ल्ड व्हिजन या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला. हा खाऊ खाल्यानंतर हाडोळी व कामनगाव येथील ७० बालकांना विषबाधा झाल्याची घटना दि १६ एप्रिल रोजी घडली आहे.  या बालकांना भोकरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले असल्याने सध्या सर्व बालकांची प्रकृती चांगली आहे. 

मागील अकरा वर्षापासून वर्ल्ड व्हिजन ही संस्था भोकर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत अंतर्गत काम करत आहे. हाडोळी येथे दि. १६ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात खाऊ वाटप करण्यात आले. हा खाऊ खाल्यानंतर हाडोळी व कामनगाव येथील ७० विद्यार्थ्यांना उलट्या सुरू पोटात दुखत असल्याने त्यांना भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी डॉ. मार्तंड आयनीले यांनी खासगी डॉक्टरच्या साहाय्याने या बालकावर उपचार केले. सध्या सर्व बालकांची प्रकृती चांगली आहे.