Sat, Dec 14, 2019 02:06होमपेज › Marathwada › नागपुरात थंडी वाढली, पारा ७.८ अंशावर 

नागपुरात थंडी वाढली, पारा ७.८ अंशावर 

Published On: Dec 27 2017 6:00PM | Last Updated: Dec 27 2017 6:00PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

नागपूर शहरात बुधवारी थंडीच्या कडाक्यात अचानक वाढ झाली असून ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदिवले गेले. हे तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले. यामुळे नागपूरकर चांगलेच गारठून गेले असून विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. विदर्भाबरोबरच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमानातदेखील सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. 

दरम्यान, पुढील  दिवसांमध्ये थंडीची लाट आणखी तीव्र बनेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर भारतात सध्या बोचरी थंडी पडली असून राजधानी दिल्लीत बुधवारी ७.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरच्या काही भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू असून तेथून राज्यात अतिथंड व कोरडे वारे वाहत आहेत. पुणे १०.८, मुंबई १६.६, रत्नागिरी २०.३, जळगाव ९, कोल्हापूर १६.१, सातारा १२.३, सांगली १४.१, औरंगाबाद १०.१, नाशिक ८.२, महाबळेश्‍वर १२, यवतमाळ १२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.