होमपेज › Marathwada › साहित्यिकच दारू पितात : शिवाजीराव मोघे

साहित्यिकच दारू पितात : शिवाजीराव मोघे

Published On: Jan 02 2018 8:16PM | Last Updated: Jan 02 2018 8:16PM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

दारूच्या एकच प्याल्याने आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, याचे वास्तव राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकातून मांडले गेले. प्रभावी शस्त्र म्हणून ओळख असलेल्या साहित्यिकाच्या लेखणीचा व्यसनमुक्तीसाठी वापर व्हायला हवा. मात्र, आजचे साहित्यिकच मद्यपी झाले आहेत, अशी खंत व्यक्त करीत, अशाने व्यसनमुक्तीची चळवळ कशी वाढेल, असा सवाल माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी उपस्थित केला.

सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या वतीने सर्वोदय आश्रम विनोबा विचार केंद्र येथे विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. रवींद्र कोल्हे, मा. म. गडकरी, सतीश कडू, बबन मोरघडे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक आदी उपस्थित होते.

साहित्यिकांनी आपली लेखणी समाज प्रबोधनासाठी चालवायला हवी. व्यसनाधीनतेमुळे आज समाज उद्ध्वस्त होत असतानाही साहित्यिक या विषयावर लिहित नाहीत. स्वतःच दारूच्या आहारी गेल्याची कबुली साहित्यिकच देतात. त्यामुळे साहित्यिकच मद्यपी झाल्याने प्रबोधन कसे होईल, असा सवाल मोघे यांनी यावेळी उपस्थित केला.